इमारतींच्या ढिगाऱ्याखाली सापडुन मृत्यू झालेल्याचां आकडा हजारोंच्या घरात…!


नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भयंकर भूकंपानंतर हजारो कोसळलेल्या इमारतींच्या ढिगार्‍याखाली श्वास घेणाऱ्या हजारो लोकांसाठी प्रत्येक जाणारा क्षण मौल्यवान आहे. या तुटणाऱ्या श्वासांना जीवदान देण्यात गुंतलेले बचावकर्ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

बर्फाळ रात्री शेकडो बचावकर्ते हाताने ढिगारा हटवून लोकांचा शोध घेत आहेत. तुर्कस्तान आणि सारियामधील स्थानिक आणि परदेशी बचाव पथके शून्याखालील तापमानात कोसळलेल्या छतावर आणि भिंतींमध्ये अडकलेले जीव वाचवण्यासाठी वेळेशी लढा देत आहेत.

दरम्यान येत्या काही दिवसांत ढिगारा हटवल्याने मृतांचा आकडा हजारोंच्या घरात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कितीतरी हजारो लोकांची काही माहिती नाही, जे झोपेतच गेले. ढिगारा साफ करताना लहान मुलांचे आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे मृतदेह बाहेर येताना पाहून हृदय विदीर्ण होते. भूकंपाच्या केंद्राजवळील मालट्या येथे 500,000 लोक राहतात. परिसरातील शेकडो इमारती पूर्णपणे कोसळल्या असून शेकडो लोक दबलेले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!