Saswad News : बैलगाडा शर्यतीदरम्यान मोठा अपघात, थेट विहिरीत कोसळला बैलगाडा, २१ लाख रुपयांच्या बैलाचा जागीच मृत्यू, पुरंदर येथील घटना..


Saswad News पुणे : बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर बैलगाडीवरील नियंत्रण सुटून सुसाट वेगात धावणारी ही बैलजोडी थेट विहिरीत जाऊन कोसळली. यात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या बैलाची किंमत २१ लाख रूपये होती. तर दुसऱ्या बैलाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं आहे. ही घटना पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे गुरुवारी (ता.१२ ) घडली आहे. Saswad News

मिळालेल्या माहिती नुसार, पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. शर्यत सुरू झाल्यानंतर बैलगाडीवरील नियंत्रण सुटलंबैलगाडी धावपट्टी सोडून धावत होती. सुसाट वेगात धावणारी ही बैलजोडी थेट विहिरीत जाऊन कोसळली.

ही घटना इतकी भयानक होती, की यात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या बैलाची किंमत २१ लाख रूपये होती . तर दुसऱ्या बैलाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान, नियंत्रण सुटलेल्या बैलगाडीला थांबवण्यासाठी गेलेल्या संदीप न्यानोबा कामथे यांच्या अंगावरून बैलगाडी गेली. त्यामुळे या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जेजुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!