Sharad Pawar : अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आता शरद पवारांनी केले मोठे विधान; म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री होणार हे..


Sharad Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोचरा वार केला आहे. Sharad Pawar

अजित पवार Ajit Pawar मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत हे काही आता लपून राहिलेले नाही.  त्यांना पूरक अशी भूमिकाही युतीसरकारमधील अनेक नेत्यांनी वारंवार घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी यावर भाष्य करताना एक प्रकारे अजित पवार यांची खिल्लीच उडवली आहे.

शरद पवार Sharad Pawar आज अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सहकार मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे.

ते म्हणाले, अजित पवारांना पूर्ण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करु अशा आशयाचे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होत. यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, आमचा आग्रह हाच असणार आहे की आम्ही तीन पक्ष एकत्र राहणार आहोत.

राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या सर्वाचे उद्या राज्य यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. जनमानसात आम्ही जो प्रतिसाद पाहतो आहोत. त्याचं जर मतांमध्ये परिवर्तीत झालं तर या तीन पक्षांचं राज्य येऊ शकतं.

दरम्यान, जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांना हार घालेन असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. त्यावर पवार म्हणाले, हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही. असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!