ये रिश्ता क्या कहलाता है? अदानी प्रश्नावरून राहुल गांधींनी मोदींना घेरले…!

नवी दिल्ली : मोदी प्रकरणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो दाखवत विचारले, ये रिश्ता क्या कहलाता है?, असे सवाल त्यांनी विचारला आहे.
यामुळे संसदेत वातावरण चांगलेच तापले होते. अदानींसाठी नरेंद्र मोदी यांनी नियम बदलले. नियम बदलून अदानींना 6 एअरपोर्टची मालकी दिली गेली, असे म्हणत राहुल गांधी यांची नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
कोणताही अनुभव नसताना अदानी यांना विमानतळ देण्यात आली. यादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा विमानात बसलेला एक जुना फोटो दाखवला. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना अडवत हे योग्य नसल्याचे सांगितले.
सभापती ओम बिर्ला म्हणाले की, सभागृहात कोणतेही पोस्टरबाजी करू नये. सत्ताधारी पक्षाकडे बोट दाखवत ओम बिर्ला म्हणाले की, त्यांनी राजस्थानची पोस्टर्सही आणली आहेत. हे अजिबात न्याय्य नाही. यामुळे गोंधळ देखील उडाला होता.