Pimpri Chinchwad : पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम ११ वर जिंकले दीड कोटी, कुटूंबाला आनंद झाला, पण आता..

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस जिकले. ही बातमी महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली.
पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे हे ड्रीम ११ वर करोडपती झाले आहेत. नुकताच झालेल्या बांगलादेश विरुद्ध इंग्लंड त्यांच्या ड्रीम इलेव्हनची टीम अव्वल आली. Pimpri Chinchwad
त्यातून सोमनाथ झेंडे यांना दीड कोटी रुपये मिळाले आहेत. यामुळे त्यांची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. मात्र आता त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑनलाइन जुगार खेळणारे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारे पत्र भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे. त्यांच्या या पत्राची काही तासातच पिंपरी- चिंचवड पोलिसांनी देखील दखल घेतली आहे.
कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. झेंडे यांची चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.