Asian Games 2023 : पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला चारली धूळ, एशियन गेम्समध्ये कबड्डीत रोवला झेंडा…

Asian Games 2023 : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई गेम्समध्ये भारताचा डंका सुरूच आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताने कबड्डीमध्ये सुद्धा सेमी फायनलमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या पुरूष संघाने पाकिस्तानला ६१-१४ अशा गुणांनी पराभूत केले. यासह भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली.
आशियाई क्रिडा स्पर्धेच्या आज १३ व्या दिवशी कबड्डीत उपांत्य उपांत्य फेरीत सामना सुरू होताच पाकिस्तान संघाने दमदार सुरवात करत ४ गुण मिळवले. त्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर करत ७-४ असे गुण मिळवत आघाडी घेतली. Asian Games 2023
परंतु पाकिस्तान खेळी करू शकला नाही. चमकदार कामगिरी करत भारताच्या संघाने गेममध्ये १५-५ अशी आघाडी कायम ठेवली. पाकिस्तानला बोनस पाॅइंट मिळणार असे वाटत होते पण बोनस पॉइंट मिळाला नाही.
पाकिस्तानची संपूर्ण टीम अनेकवेळा बाद ठरल्याने, भारताचा संघ मजबूत दिसून आला. पाकिस्तानच्या संघाला कोणतीही हालचाल न करता आल्याने, २१-५ अशी आघाडी भारतीय संघाने कायम राखली.
भारतीय खेळाडून आक्रमक चढाई करत पाकिस्तानला नामोहरम केले. या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघ पाचवेळा ऑलआउट झाला. दरम्यान भारतीय संघाने ५१-८ अशी भक्कम आघाडी कायम ठेवली.
पुन्हा सहाव्यांदा भारतीय संघाने पाकिस्तानचा संघ ऑलआउट करत, भारतीय संघाने संपूर्ण सामन्यात ५९-१० गुणांसह चढाई कायम ठेवली. कबड्डीच्या अंतिम टप्प्यात भारतीय संघाने ६१-१४ अशा फरकाने पाकिस्तानचा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, महिला कबड्डीच्या उपांत्य फेरीत भारताने नेपाळवर दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिलांनी ६१-१७असा सरळ विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळवले. दुसरीकडे, १३व्या दिवशी, फिरकीपटू साई किशोरच्या अपवादात्मक गोलंदाजीच्या कामगिरीने, कर्णधार रुतुराज गायकवाड आणि टिळक वर्मा यांच्या स्फोटक फलंदाजीच्या प्रदर्शनाने भारत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत गेला.