Pune Accident : पुण्यात मांजरी उड्डाणपूलावर मोठा अपघात, १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, मोठा भाऊ थोडक्यात वाचला..


Pune Accident पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या अशीच एक अपघाताची माहिती समोर आली आहे. पुण्यातील मांजरी उड्डाणपुलावर गुरुवारी (ता. ५) संध्याकाळी भीषण अपघात झाला. डंपरने दुचाकीला धडक दिली.

या भीषण अपघातात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर त्याचा मोठा भाऊ बचावला. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.

रियाज अजिज खान (वय १४, राहणार वैशाली हॉटेल मागे, हडपसर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मोठा भाऊ इजाज (वय. २१) या अपघातातून बचावला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, रियाज आणि इजाज हे दोघेही घरगुती कामासाठी दुचाकीवरून जात होते. मांजरी उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला एका डंपरने धडक दिली. या अपघातात रियाजचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवत असलेला इजाज हा बचावला आहे.

इजाज हा दुचाकी चालवत होता. त्याच्या मागे रियाज बसला होता. दोघेही हडपसरवरून मांजरीच्या दिशेला जात होते. मांजरी उड्डाणपुलावरून जात असताना डंपरने दुचाकीला धडक दिली. पाठीमागे बसलेल्या रियाजला डंपरने चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!