Pune Rain : पुणे जिल्ह्यातून मान्सूनची माघार कधी? आयएमडीने दिले अपडेट, अनेक धरणे अजून १०० टक्के नाहीच..

Pune Rain पुणे : राज्यात पावसाने अतिशय उशिराने एन्ट्री मारली. त्यानंतर पाऊस चांगलाच बरसला. काही दिवस बरसला. त्यानंतर पुन्हा त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर तो पुन्हा आला. पण नंतर ऑगस्ट महिन्यात त्याने जी सुट्टी घेतली तो शेवटपर्यंत आलाच नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले. Pune Rain

आता पुणे परिसरातून पाऊस कधीपासून परणार आहे? त्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. देशातही मान्सूनचा हंगाम संपला आहे. तसेच अनेक राज्यात परतीचा पाऊस सुरु झाला आहे. Pune Rain
पुणे जिल्ह्यातून आगामी दोन दिवसांत पाऊस परतणार आहे. तसेच राज्यातून आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम काश्यपी यांनी म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाच्या पट्यामुळे पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत होता. आता बंगालच्या उपसागरात बदल झाला असून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे.
पुणे शहर व जिल्ह्यात यंदा पावसाची तूट होती. मान्सूनच्या चार महिन्यांत आतापर्यंत ६८४.१ मिलिमीटर पाऊस पुणे जिल्ह्यात झाला आहे. पावसाचे हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७८.९ टक्के आहे.
यामुळे यंदा मान्सून सामान्य असणार? त्यावर अल निनोचा प्रभाव नसेल? हा हवामान विभागाचा अंदाज चुकला आहे. मागील वर्षी पुणे जिल्ह्यात १०४७.५ मिलिमीटर पाऊस झाला होता. म्हणजेच या वर्षी ३६३.४ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे.