Gautami Patil : गौतमी पाटीलला कोल्हापूरनंतर अजून एका जिल्ह्यात बंदी, नेमकं झालं काय जाणून घ्या..


Gautami Patil सिंधुदुर्ग : नृत्यांगणा’ गौतमी पाटील नेहमीच आपल्या नृत्यामुळे कायम चर्चेत असते. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमात वाद, गोंधळ होणं सुरुच असत.मात्र गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. Gautami Patil

कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्गातही गौतमीला नो एन्ट्री आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमीच्या डीजे डान्स शो आयोजित करण्यात आला होता. मात्र अनेकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवल्यानंतर आयोजकांनी तांत्रिक कारण देत कार्यक्रम रद्द केला.

सोशल मीडियावर नेटकरी टीका करत होते. सुसंस्कृत अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नृत्यांगणा गौतमी पाटीलचा हिचा डान्स कोकणात होता कामा नये अशी चर्चा सोशल मीडियावर होती. अखेर गौतमी पाटील हीच कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.

७ आणि ८ ऑक्टोबरला कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमी पाटीलचा डीजे डान्स शो होता आयोजित करण्यात आला होता. ८ ऑक्टोबरला कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे मराठा समाज हॉल येथे सकाळी ११ वाजता आणि कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठाण येथे सायंकाळी पाच वाजता ‘गौतमी पाटील डीजे डान्स शो’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण काही तांत्रिक कारणांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी आयोजित कॉमेडीचे सुपरस्टार हा “चला हवा येउ द्या” फेम सर्व कलाकारांच्या कॉमेडीच्या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू आहे. हा कार्यक्रम होणार आहे, असे देवगडचे अम्युझमेंट सेंटर धैर्यशील पाटील संचालक यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!