Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवार नाराज? मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर, पडद्यामागे काय घडतंय?

Ajit Pawar मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत.तसेच राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे, या बैठकीला अनेक बडे नेते उपस्थित होते. मात्र यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar )उपस्थित नव्हते अशी माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आता अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा जोरदार सुरू झाले आहे. याच नाराजीतून अजित पवार गणेशोत्सव काळात मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले नाहीत. तसेच अजित पवार यांनी नाराजीतून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजेरी लावल्याची चर्चा आहे.
अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले नाहीत. त्यानंतर गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गेले होते.

यावेळी या तीनही बड्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली होती. पण त्यानंतरही अजित पवार हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत. अजित पवार कोणत्याही प्रशासकीय बैठकांना टाळत नाहीत. असे असताना ते आजच्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीला मात्र ते गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
