Indapur News : इंदापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आज रात्री सर्व तलावात खडकवासला धरणातून पाणी सोडणार…
Indapur News इंदापूर : सध्या खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे. यामुळे प्रकल्पात जवळपास शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. परंतु या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या इंदापूर तालुक्यामध्ये पाऊस नसल्याने सध्या खडकवासला प्रकल्पावरील तालुक्यातील पाझर तलाव कोरडे पडले आहेत. Indapur News
असे असताना आता इंदापूर तालुक्यातील सर्व तलावांमध्ये खडकवासला कालव्याद्वारे पाणी सोडले जाणार आहे. यामुळे शेतीला पाणी मिळणार आहे. आज रात्रीपासून प्रत्यक्षात तलावात पाणी सोडले जाणार आहे.
हे पाणी सोडण्याबाबतच्या सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांना दिल्या आहेत. या क्षेत्रातील पिके देखील पाण्याला आलेली आहेत.
याबाबत इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तलावांमध्ये पाणी सोडावे, अशा सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या होत्या. याबाबत शेतकरी देखील मागणी करत आहेत.
आमदार भरणे यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने सध्या असलेल्या पाणी साठ्याची माहिती घेतली. त्यानुसार जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील तलावात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे.