CNG-PNG Price : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरच्या सुरुवातीला सीएनजी-पीएनजीचे घसरले दर, जाणून घ्या नवीन दर..


CNG-PNG Price मुंबई : सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सीएनजी-पीएनजीचे दर घसरले आहेत. काल मध्यरात्रीपासून दर बदलले आहेत.  CNG-PNG Price

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीची किंमत ३ रुपयांनी तर पीएनजीची किंमत २ रुपयांनी कमी झाले आहे. याबाबत कंपनीने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. CNG-PNG Price

सीएनजी आणि पीएनजी मुंबईत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मोठ्या संख्येने वाहनधारक सीएनजी वाहने वापरतात. मुंबईत अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी पीएनजीचा वापर केला जातो.

या दोन्हीचे दर मध्यंतरीच्या काळात वाढले होते. तसेच हे दर आता कमी करण्यात आले आहे. मुंबईत आता ग्राहकांना सीएनजी हा ७६ रुपये प्रति किलो तर तर पीएनजी हा ४७ रुपये प्रती किलो रुपयांना मिळणार आहे.

मुंबईतील सीएनजी वापरकर्ते पेट्रोलवर ५० टक्के आणि डिझेलवर २० टक्के बचत करतात. दरम्यान, पीएनजीचे दर घरगुती एलपीजीपेक्षा कमी आहेत. एलपीजीच्या तुलनेत पीएनजी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक देखील असून याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!