Bank Holiday : ऑक्टोबरमध्ये सुट्टयाच सुट्या! ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या..

Bank Holiday पुणे : सप्टेंबर महिना संपत आला आहे. यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होईल. पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये अनेक सण येणार आहेत. अशा परिस्थितीत बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

तुम्हालाही बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला नंतर त्रास होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या निर्देशानुसार, पुढच्या महिन्यात बँका काही दिवशी बंद राहतील.
प्रादेशिक सुट्ट्या राज्य सरकार ठरवतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या सुट्ट्यांच्या (Bank holiday) यादीनुसार, पुढील महिन्यात देशभरात बँकांना एकूण १६ दिवस सुट्या असतील. महाराष्ट्रात एकूण ९ दिवस बँका बंद राहणार आहेत.

ऑक्टोबरमध्ये इतक्यादिवस बँका राहतील बंद..
१ ऑक्टोबर- रविवार
२ ऑक्टोबर- गांधी जयंती
८ ऑक्टोबर- रविवार
१४ ऑक्टोबर- शनिवार
१५ ऑक्टोबर- रविवार
२२ ऑक्टोबर- रविवार
२४ ऑक्टोबर- दसरा/ विजयादशमी
२८ ऑक्टोबर- चौथा शनिवार
२९ ऑक्टोबर- रविवार