Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती येथे दुचाकीवर कट मारल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने सपासप वार, चौघांवर गुन्हा दाखल..

Loni Kalbhor News पुणे : दुचाकीवरुन जाताना कट मारल्याचा जाब विचारल्याने चौघा जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्नl केला. ही घटना कदमवाक वस्तीत इंदिरानगर चौकात सोमवारी (ता.२५) रात्री साडेदहा वाजता घडली आहे. Loni Kalbhor News

याप्रकरणी मनोज दिलीप मोरे (वय. २४, रा. इंदिरानगर, कदम वाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रथमेश अहिरे (रा. सिंद्राममळा, लोणी काळभोर), प्रणव भारत सिरसाठ (रा. कदमवाक वस्ती), अभिजित अभिमन्यू आहेरकर (रा. लोणी काळभोर) आणि अभिषेक दत्तात्रय रामपुरे (रा. लोणी काळभोर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि प्रथमेश अहिरे व प्रणव सिरसाठ हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादीस दुचाकीचा कट मारला. त्यावर फिर्यादी यांनी कट का मारला, असा जाब विचारल्याने त्याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रावर कोयत्याने मारहाण करुन त्यांना जबर जखमी केले.

दरम्यान, आजुबाजूच्या परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करीत आहेत.
