Wablewadi School Case : वारे गुरुजींना प्रकाश महाजनांच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा! वाबळेवाडीत नेमकं काय घडलं…?


Wablewadi School Case  शिरूर : येथील वाबळेवाडी येथे १४ जुलै २०२१ रोजी एक प्रकरण सुरू झाले होते. गंभीर आरोप सहन न झाल्याने अनवाणी राहिलेल्या वाबळेवाडी येथील माजी मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्या पायांच्या वेदना शमविण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, असे मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.  Wablewadi School Case

याचवेळी त्यांनी त्यांच्या पायाला चंदन लावून पायही धुतले. या शिक्षकांच्या नशिबी असले वाइट दिवस येणे हे राज्याचे दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

या शिक्षकांच्या नशिबी असले वाइट दिवस येणे हे राज्याचे दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यामुळे याची चर्चा सध्या शिरूरमध्ये सुरू आहे. Wablewadi School Case

हे प्रकरण सुरू झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने वारे यांचे निलंबन केले होते. यामुळे हे प्रकरण जिल्ह्यात गाजले होते. वारे यांना हा प्रकार इतका खटकला की, त्यांनी त्या दिवसापासून अनवाणी राहणे सुरू केले.

त्यांनी या प्रकरणात आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने अनवाणी राहण्याचा निश्चय केला होता. दरम्यान, त्यांना झालेल्या वेदना शांत व्हाव्यात आणि एका आदर्श शिक्षकाच्या पाठीशी महाराष्ट्र असल्याचे सांगण्यासाठीच आपण इथे आल्याचे सांगितले.

तसेच त्यांनी स्वत:सोबत आणलेल्या चंदन, एक परात आणि पाणी यांनी वारेंच्या पायाला चंदन लावले व ते धुऊन एका आदर्श गुरूची सेवा केली. याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहे.

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!