Gold Silver Rate : सणासुदीच्या काळात सोने-चांदी झाले स्वस्त, प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर काय आहेत.? जाणून घ्या…

Gold Silver Rate नवी दिल्ली : सोने आणि चांदीची खरेदी करणार्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली तर चांदीचा भावही उतरला आहे. आज १० ग्रॅमसाठी सोन्याचे दर हे ५९ हजार २३८ रुपयांवर होते. गेल्या ट्रेडिंग दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात ४४ रुपयांची घसरण झाली आहे. Gold Silver Rate

सोन्याव्यतिरिक्त, आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये चांदी सुरुवातीला ७२ हजार २८४ रुपये प्रति किलोवर गेली होती.
यानंतर त्यात काही वाढ नोंदवण्यात आली असून सध्या दुपारी १२.३० वाजता ०. ०९ टक्के किंवा ६४ रुपये प्रति किलोने घट होऊन ७२,५०५ रुपये प्रति किलोवर गेली आहे. काल चांदीचे दर हे ७२ हजार ५६९ रुपये प्रति किलो होते. आज यामध्ये घट झाल्याचे दिसून आले.

शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर काय आहेत?
पुणे- २४ कॅरेट सोने ६०,२३० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलो

मुंबई-२४ कॅरेट सोने ६०,२३० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलो
दिल्ली- २४ कॅरेट सोने ६०,३७० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलो
हैदराबाद- २४ कॅरेट सोने ६०,२३० रुपये, चांदी ७८,००० रुपये किलो
जयपूर- २४ कॅरेट सोने ६०,३७० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलो