Social Media : सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी आता वयाची अट..? मतदानाचा अधिकार आल्यावर वापर करा, हायकोर्टाने स्पष्टच सांगितलं


Social Media : सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्येष्ठ व्यक्तींसह तरुण आणि लहान मुलेही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. अनेक लहान मुलांचे सोशल मीडियावर अकाउंट आहेत. ते त्याच्या भरपूर प्रमाणात वापर करत असतात.

यावर आता हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला तब्बल १ हजार ४७४ खाती, १७५ ट्वीट, २५६ यूआरएल आणि एक हॅशटॅग हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३९ यूआरएलच्या संदर्भात आदेशाला ट्विटरने उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते.

मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतरच मुलांनी सोशल मीडियाचा वापर करावा, असंही हायकोर्टाने सांगितले आहे. मद्यपान करण्यासाठी वयोमर्यादा आखून देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे याचा देखील विचार व्हावा असे , असेही कोर्टाने सूचवले आहे.

या याचिकेवर कर्नाटक हायकोर्टाने एक्स कॉर्पला ५० लाखांचा खर्च देण्याचा आदेश दिला असून मद्यपान करण्यासाठी जशी वयोमर्यादेची अट असते, तशी अट सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे. सरकारने त्याबाबत विचार करायला हवा, अशी टिप्पणी कर्नाटक हायकोर्टाने केली आहे.

जशी मद्यपानासाठी वयोमर्यादेची अट असते, तशी अट सोशल मीडिया वापरायला सुद्धा हवी. सरकारने समाजमाध्यमांच्या वापरासाठी वयोमर्यादा लागू करण्याचा विचार केला पाहिजे. अशी टिप्पणी देखील हायकोर्टाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!