Pune Crime : बांधकाम व्यावसायिकाची ४ कोटींची फसवणूक करुन मागितली १५ कोटींची खंडणी, चार जणांवर गुन्हा दाखल…

Pune Crime पुणे : पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक करुन १५ कोटी रुपये खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. (Pune Crime)
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ डिसेंबर २०१३ ते जून २०२३ दरम्यान हवेली तालुक्यातील पिसोळी येथे घडला आहे.
याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक राहुल प्रेमप्रकाश गोयल (वय. ३८ रा. ढोलेपाटील रोड, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी कुणाल शंकर मासाळ, अनिता शंकर मासाळ, चैताली शंकर मासाळ, तेजस शंकर मासाळ (सर्व रा. पिसोळी, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांनी आरोपींच्या मालकीची पिसोळी येथील १ हेक्टर ३५ आर जमीन २९ डिसेंबर २०१३ रोजी हवेली येथे दस्त करुन विकसनासाठी घेतली होती.
त्यानुसार १९ टक्के रेव्हेन्यू शेअरीग आरोपींना देण्याचे ठरले होते. असे असताना आरोपींनी १९ टक्के रव्हेन्यू शेअरींग ऐवजी ३८ टक्के सेलेबल बांधकाम क्षेत्र देण्याची मागणी केली. तसेच फिर्यादी यांना आरोपींच्या हिस्स्यावर ४ कोटी रुपयांचे बांधकाम करण्यास भाग पाडले.
आरोपींनी ठरल्याप्रमाणे चुकीची दुरुस्तीचा दस्त करुन दिला नाही तसेच फिर्यादी यांनी त्यांच्या हिस्स्यामध्ये केलेल्या बांधकामाचा ताबा न घेता चार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर आरोपींनी 38 टक्के रेव्हेन्यू शेअरींग किंवा सेलेबल बांधकाम घेण्यास नकार देऊन 15 कोटी रुपयांची खंडणी
मागितली.
एरिया स्टेटमेंट आफ्टर युडीसीपीआर २०२० च्या नियमावलीचा खोटा दोस्त तयार करुन तो खरा असल्याचे भासवून फिर्यादी यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. याबाबत फिर्यादी राहुल गोयल यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर न्यायालयात याचिका दाखल केली.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशावरुन कोंढवा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटीलकरीत आहेत.