Pune News : कौतुकास्पद! चालक बनला देवदूत, PMPML बसचा ब्रेक फेल झाला अन् चालकाने डोकं लढवून प्रवाशांचे वाचवले जीव


Pune News पुणे : बस चालकाला अपघातासाठी कायम दोषी ठरवले जाते मात्र याच बस चालकाने प्रसंगावधान दाखवून बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. पुण्यातील गणेश खिंड रोडवर हा प्रकार समोर आला आहे.

स्टिअरिंग रॉड आणि ब्रेक खराब झाले, ज्यामुळे बस नियंत्रणाबाहेर गेली मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बस थेट झाडावर नेऊन आदळली. त्यामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचा जीवही वाचला आहे. या बस चालकाचं आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

पुण्यातील गणेश खिंड रोडवर रात्री साडे आठच्या दरम्यान बसचा स्टिअरिंग रॉड आणि ब्रेक खराब झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं. त्यानंतर चालकाने थेट बस झाडावर नेऊन आदळली.

यामुळे प्रवाशांना धक्का बसला. प्रवासी भडकले आणि चालकाला दोष देत होते. मात्र काही वेळाने ब्रेक फेल झाल्याने चालकाने जीव वाचवण्यासाठी बस आदळल्याचं कळल्यावर प्रवाशांनी चालकाचे आभार मानले.

गणशे खिंड रोडवर कायम वाहनांची गर्दी असते. त्यात चारचाकी आणि दुचाकीवर स्वार असलेल्या नागरिकांसोबत पायी चालणारे नागरिकदेखील असतात.

या चालकाने प्रसंगावधान दाखवून जर बस झाडावर नेऊन आदळली नसती तर अनेक प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता आणि बस सुसाट सुटली असती तर रस्त्यांवरील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. मात्र चालकाने वेळ साधला आणि सगळ्यांचाच जीव वाचला.

दरम्यान, या धडकेमुळे बसचे नुकसान झाले आणि तिचा विंडस्क्रीन चक्काचूर झाला तर झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या. फक्त दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने औंध रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!