प्रियकरासोबत राहण्यासाठी भावजयने रचला कट, भेकराईनगर येथील नामांकीत डॉक्टराचे अपहरण करून उकळले पैसे; लोणी काळभोर पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या…

उरुळी कांचन : भेकराई नगर येथील एका नामांकीत डॉक्टराचे अपहरण करून पैसे व सोन्याचे दागीने लुटणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माऊली ऊर्फ ज्ञानदेव महादेव क्षिरसागर, (मुळ रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापुर जि. पुणे सध्या रा. मु. पो. शेंद्री, ता. बार्शी, जि. सोलापुर) राहुल दत्तु निकम, (वय २७ वर्षे, रा. मु. पो. शहा, ता. इंदापुर, जि. पुणे) नितीन बाळु जाधव, (वय २५ वर्षे, रा. मु. पो. शहा, ता. इंदापुर, जि. पुणे) सुहास साधु मारकड, (वय २८ वर्षे, रा. मु. पो. पडस्थळ, ता. इंदापुर, जि. पुणे) विदया नितीन खळदकर, (वय ३५ वर्षे, रा. ढगेमळा, कुर्डुवाडी रोड, ता. बार्शी जि. सोलापुर) संतोष धोंडीबा गोंजारी ऊर्फ राणी पाटील (तृतिय पंथी), (वय ३४ वर्षे, रा. मुळ रा. जगलबेट, ता. जोथाडा, जि. कारवार, कर्नाटक सध्या. मु. पो. लोणीदेवकर, ता. इंदापुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी डॉ. प्रदिप मारुती जाधव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी हे व्हेटनरी डॉक्टर आहेत. त्यांचा व पत्नीचा न्यायालयात घटस्फोटासाठी खटला सुरु आहे. त्यात मालमत्तेचा वादही आहे. त्यांना वडकी येथील पवार वस्तीत कुत्रे आजारी असल्याचे सांगून उपचारासाठी बोलावले. त्यानुसार ते तेथे गेले. तेव्हा १० जणांना विचारणा केली. त्यातील २ ते ३ जणांनी त्यांना एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण करून त्यांना दिवे घाटमार्गे वनपुरी आंबोडी, वाघापूर या ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी दिली.
चाकूने हाताला दुखापत केली. पैसे कोठे आहेत, अस म्हणून गळ्याला व पोटाला चाकू लावून तुझ्या नावाची तुझी पत्नी व मेव्हण्याने सुपारी दिली आहे. त्यांचा मोबाईल व घराच्या चाव्या जबरदस्तीने घेतल्या. घरातून २ लाख १० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व रोख २५ लाख रुपये असे २७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतले.
दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता तपासा दरम्यान असे दिसुन आले की यातील आरोपी यांनी अत्यंत चालाखीने व नियोजनबध्द रितीने कट रचुन कोणताही पुरवा पाठिमागे राहणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतली होती.
तरीसुध्दा पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे व तपासपथकातील त्यांचे सहकारी अंमलदार यांनी चिकाटीने व कौशल्यपूर्ण तपास करुन तांत्रिक विश्लेषण तसेच सी सी टी व्ही फुटेजचे आधारे आरोपी निष्पन्न करण्यात यश मिळवले. आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास केला असता सदर घटनेची अशी उकल झाली की ज्यामुळे पोलीसही चक्रावुन गेले.
फिर्यादी हे त्यांचे दुसऱ्या पत्नी सोबत राहण्यास असुन त्यांचे पहिले पत्नीची घटस्फोटाची केस न्यायालयाल चालु आहे. त्यामध्ये फिर्यादी यांनी त्यांचे पहिले पत्नीस पोटगी रक्कम म्हणुन २० लाख रुपये देणे बाबत न्यायालयाचे आदेश झाल्याने फिर्यादी यांनी सदरचे रक्कमेची जुळवा जुळव करुन घरात आणुन ठेवली होती.
त्यानंतर काही कारणाने फिर्यादी यांची दुसरी पत्नी ही तीचे माहेरी बार्शी सोलापुर येथे गेली होती. घरात बोलता- बोलता तिचेकडुन नवऱ्याने घरात आणुन ठेवलेल्या पैशांचे बाबत तिची भावजय विदया नितीन खळदकर हिला समजले. विदया हिचे राहुल निकम याचे सोबत विवाहबाहय प्रेमसंबंध सुरु होते. तीला तीचे प्रियकरा सोबत एकत्र रहायचे होते.
त्यानंतर (ता.८) मंगळवार रोजी दुपारी पुन्हा एकत्रित येऊन डॉक्टरांना लुटण्याचा फायनल प्लॅन केला त्याप्रमाणे विदया हि डॉक्टराची नातेवाईक असल्याने प्रत्यक्ष घटनेचे दिवशी कारवाईत सामील न होता. बाकी नियोजन करणार होती.
तर राणी पाटील हि तृतियपंथी असल्याने काही काळासाठी ॲक्टीव्ह करण्यात आलेल्या सिम वरुन डॉक्टरांना फोन करुन त्यांचे घरा पासुन फार लांब नसलेल्या अंतरावर कुत्र आजारी असल्याचे सांगुन बोलावुन घेणार.
त्यानंतर बाकी साथीदारांनी डॉक्टरांचे जबरदस्तीने अपहरण करायचे या ठरलेल्या प्लॅन नुसार त्यांनी नियोजन बध्द गुन्हा करुन डॉक्टरांना लुटले. यातील फिर्याद यांचे पहिल्या पत्नी सोबत असलेल्या वादा बाबत आरोपी विदया हिला माहिती असल्याने तीचे साथीदार आरोपींना तीने डॉक्टरांना लुटते वेळी त्यांना तुमचे पहिली पत्नी व मेहुण्याने तुला मारण्याची सुपारी आम्हाला दिली असल्याची सांगण्यास सांगीतले होते.
आरोपींनी कोणताही पुरावा पाठिमागे राहणार नाही याची काळजी घेऊन नियोजन बध्द रित्या रचलेला कट असल्याने याची उकल होणे तसे अवघडच होते. परंतु लोणीकाळभोर पोलीसांचे कौशल्यपूर्ण तपासामुळे यातील आरोपींचा शोध लावून त्यांनीगुन्ह्याची कबुली दिली.
तापर्यंतचे तपासात त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली रेनॉल्ट कंपनीची क्विड कार मारुती स्विफ्ट डिझायर कार, बजाज प्लॅटीना मोटारसायकल, हिरो कंपनीची स्पोर्टस बाईक, तक्रारदार यांचा तोडुन फोडुन फेकुन दिलेला मोबाईल हॅन्डसेट, तसेच आरोपीतांचे वापरते एकुण ६ मोबाईल हॅन्डसेट, सोन्याचे दागीने तसेच गुन्हयात लुटलेली बारा लाख रुपये रोख रक्कम असा एकुण २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सध्या आरोपी पोलीस कोठडी रिमांड मध्ये असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.