महाराष्ट्रातील निवडणुकीत ७० लाख नवीन मतदार? महायुती का जिंकली? अतिशय धक्कादायक माहिती आली समोर…


नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीकाल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.तसेच महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत इतक्या मोठ्या संख्येने नवीन मतदार आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला.

राहूल गांधी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सभागृहात उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्रात हिमाचलच्या बरोबरीने मतदारांची भर पडल्याचं राहुल गांधींनी लोकसभेत सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण लोकसंख्येइतके नवीन मतदार मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याच राहुल गांधींनी म्हटलं आहे. ही मतदारांची संख्या कुठून आली? असा सवाल राहुल गांधींनी विचारलं आहे.

राहुल गांधी म्हणाले, ‘मी राष्ट्रपतींचे भाषण ऐकले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान काय बोलले जात होते यावर माझे लक्ष केंद्रित करण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. कारण मी गेल्यावर्षी आणि त्यापूर्वीच्या वर्षी जवळजवळ असेच भाषण ऐकले होते. विरोधी पक्ष जर युती सरकार असते तर हे भाषण असे नसते, असे ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, लोकसभेत राहुल गांधींनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केलीय. आपलं उत्पादन क्षेत्र आपण चीनच्या हाती सोपवलं असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे. सोबतच मेक इन इंडिया चांगली कल्पना होती पण अयशस्वी झाली असल्याचंही म्हंटले आहे. देशातील उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!