बायको नांदायला येत नाही, म्हणून नांदेड मधील ३० वर्षीय युवकाचे चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन…!


नांदेड : नांदेड येथे  काल सकाळी एक विचित्र घटना घडली.  ३० वर्षीय युवकाने बायको नांदायला येत नसल्याच्या चिंतेने  पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले असून, देविदास बलदेवसिंग सिबिया (वय ३०) रा. बेदांतनगर, नांदेड असे तरुणाचे नाव आहे.

देविदास सीबिया याची पत्नी रेखा आणि तीन मुलं मागच्या काही दिवसापासून त्याच्यासोबत रहात नाहीत, त्यामुळे तो चिंतेत आहे. त्यामुळे सदर तरुणाने आपली बायको आणि मुलांना बोलावण्यासाठी शहरातील शोभानगर येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून सकाळी १० वाजताच्या सुमारास शोले स्टाईल आंदोलन केले. बायको व मुलांना बोलवा अन्यथा, टाकीवरून खाली उडी मारू असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिस पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेत, सदर तरुणास खाली येण्यासाठी विनंती केली. मात्र जो पर्यंत बायको आणि मूल घरी येणार नाहीत तो पर्यंत आपण खाली येणार नाही असा निश्चय त्याने केला आहे. यावेळी शोभानगरच्या पाण्याच्या टाकीजवळ शोले स्टाईल आंदोलन बघण्यासाठी बघ्यांनी चांगलीच गर्दी केली होती. वृत लीहीपर्यंत सदर तरुण टाकीखाली उतरला नव्हता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!