Crime : विवाहित महिलेवर ३० वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार; ब्लॅकमेल करून उकळले पैसे


छत्रपती संभाजीनगर : पोलीस कर्मचाऱ्यानेच बलात्कार करून ब्लॅकमेल करत दोन लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. या प्रकरणी ३० वर्षांच्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

४४ वर्षीय विवाहित महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अंमलदार विशाल सुखदेव दांडगे (वय ३०) वर्षांच्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार देणारी महिला ही तिच्या मुलांसह छावणी परिसरात राहते. विशाल दांडगे हा काही वर्षांपूर्वी वेदांतनगर पोलीस ठाण्यात होता. त्यावेळी वेदांतनगर परिसरात खासगी काम करणाऱ्या महिलेशी त्याची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. दोघेही त्यानंतर सतत भेटत होते. विशाल दांडगे याने अनेकदा हॉटेलमध्ये, मिलन कॉर्नर इथं असणाऱ्या सरकारी निवासस्थानी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप महिलेने तक्रारीत केले आहेत.

पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केले, त्यानंतर ब्लॅकमेल करत दोन लाख रुपये उकळले. तसंच अचानक बोलणं बंद केल्याचंही महिलेने म्हटलंय. संबंधित महिला पतीपासून विभक्त झाली आहे. ती आपल्या मुलांसोबत राहते. याआधीही महिलेने अत्याचाराचा अर्ज पोलिसात केला होता. पण तिने अर्ज मागे घेतले होते. आता शुक्रवारी पुन्हा तिने पोलीसात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, ४४ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केला असून पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!