‘SKY’ OUT, श्रेयस IN! BCCI चा मास्टरस्ट्रोक; 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची थेट टीम इंडियात एंट्री, आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी खतरनाक संघ जाहीर


मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय अखेर समोर आला आहे. टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला मोठा धक्का देत बीसीसीआयने आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवले आहे. एवढेच नाही तर आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजीने जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अवघ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला थेट भारतीय संघात संधी देत निवड समितीने भविष्यातील सुपरस्टारवर मोठा विश्वास दाखवला आहे.

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर 2023 नंतर टी-20 संघाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यरचे केवळ पुनरागमनच झाले नाही, तर त्याला थेट कर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारखे अनुभवी पर्याय उपलब्ध असतानाही निवड समितीने श्रेयसच्या नेतृत्व क्षमतेवर आणि मोठ्या सामन्यांतील कामगिरीवर विश्वास व्यक्त केला आहे.

सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्मशी झुंजत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे, आयपीएलमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करणारा श्रेयस अय्यर मधल्या फळीत संघाला स्थैर्य देऊ शकतो, असा विश्वास निवडकर्त्यांना आहे.

या संघ निवडीतील सर्वात मोठी बातमी म्हणजे वैभव सूर्यवंशीची निवड. अवघ्या 15 वर्षांच्या या युवा फलंदाजाने आयपीएल 2026 मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्याने 16 सामन्यांत तब्बल 776 धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. याचबरोबर एका हंगामात सर्वाधिक 72 षटकार मारण्याचा विक्रमही त्याने केला. त्याचा 237.30 चा स्ट्राइक रेट क्रिकेट तज्ज्ञांनाही थक्क करणारा ठरला. या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला थेट भारतीय संघाचे दार उघडले आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि वैभव सूर्यवंशी.

भारताचे वेळापत्रक :

आयर्लंड दौरा

26 जून : पहिला टी-20 (बेलफास्ट)
28 जून : दुसरा टी-20 (बेलफास्ट)

इंग्लंड दौरा

1 जुलै : पहिला टी-20 (चेस्टर-ली-स्ट्रीट)
4 जुलै : दुसरा टी-20 (मँचेस्टर)
7 जुलै : तिसरा टी-20 (नॉटिंगहॅम)
9 जुलै : चौथा टी-20 (ब्रिस्टल)
11 जुलै : पाचवा टी-20 (साऊदम्प्टन)

श्रेयस अय्यरचे दमदार पुनरागमन, सूर्यकुमार यादवला बसलेला धक्का आणि वैभव सूर्यवंशीसारख्या युवा खेळाडूला मिळालेली मोठी संधी यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!