दहावी बोर्डाचा निकाल अखेर जाहीर!! यंदाही राज्यात मुलींनी मारली बाजी, जाणून घ्या…


पुणे : यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे. या निकालाकडे विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे लक्ष लागले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. यामुळे मुलांमध्ये धाकधूक वाढली आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार आहे.

याबाबत मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. यामध्ये पुणे : 94.81 टक्के,नागपूर : 90.78 टक्के संभाजीनगर : 92.82 टक्के, मुंबई : 95.84 टक्के, कोल्हापूर : 96.78 टक्के, अमरावती : 92.95 टक्के, नाशिक : 93.04 टक्के, लातूर : 92.77 टक्के, कोकण : 99.82 टक्के अशी टक्केवारी आहे.

दरम्यान, यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्रास कमी होणार आहे.

दरम्यान, निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट संकेतस्थळांवर दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन प्रवेश मिळेल. शालेय जीवनाचा पहिला मोठा टप्पा पार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा राज्यभरातून एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!