जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख ठरली? समोर आली सर्वात मोठी अपडेट, जाणून घ्या….


मुंबई : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठी हालचाल सुरू झाली असून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आता वेगाने आकार घेत आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी या सर्व निवडणुका पार पाडणे बंधनकारक असल्याने राज्यात निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांचे गण यांच्या प्रभाग रचना पूर्ण केल्या आहेत.

आता राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. १ जुलै २०२५ च्या विधानसभा मतदार यादीवर आधारित गट व गणनिहाय विभागणी करून नवीन यादी तयार केली जाणार आहे.

८ ऑक्टोबर २०२५- प्रारूप मतदार यादी तयार होईल.

८ ते १४ ऑक्टोबर २०२५ – हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील.

२७ ऑक्टोबर २०२५ – मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर होईल.

यामुळे ऑक्टोबरच्या अखेरीस मतदार यादी निश्चित होईल आणि त्यानंतर काही दिवसांतच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात. तर जानेवारी २०२६ मध्ये राज्यातील महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये भंडारा, गोंदिया, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे चार जिल्हे वगळण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!