Zika Virus : मोठी बातमी! पुण्यात आढळले झिका व्हायरसचे दोन रुग्ण, उडाली खळबळ…
Zika Virus : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे, पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे.
झिका रुग्ण आढळलेल्या परिसराचे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. परिसरातील अनेक लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.
झिका विषाणू देखील डेंग्यू सारख्या डासांच्या चावण्यामुळे होतो, जरी त्याची प्रकरणे डेंग्यूपेक्षा कमी आहेत, परंतु हा एक धोकादायक रोग देखील आहे. पावसाळ्यात झिका विषाणूचा प्रसार करणाऱ्या डासांचाही धोका आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. Zika Virus
डेंग्यू आणि झिका हे दोन्ही विषाणूजन्य आजार आहेत आणि ते डासांच्या चाव्याव्दारे होतात, परंतु त्यांची लक्षणे आणि शरीराला होणारे नुकसान यामध्ये फरक आहे. अशा परिस्थितीत, या दोन रोगांच्या लक्षणांमधील फरक जाणून घेणे आवश्यक आहे.
झिका व्हायरसची लक्षणे काय?
सौम्य ताप
शरीरावर पुरळ उठणे
डोळ्यात लालसरपणा
स्नायू आणि सांधेदुखी
डोकेदुखी