Yugendra Pawar : युगेंद्र पवार यांचा मोठा निर्णय! थेट मतदान तपासणी प्रक्रियेतून माघार, नेमकं कारण काय?


Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवारांनी ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज केला होता. मात्र त्यांनी तो अर्ज आता माघारी घेतला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवारांनी तर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली.

बारामती मतदारसंघातून अजित पवारांनी विक्रमी मतांनी बाजी मारली. त्यानंतर युगेंद्र पवारांनी मतमोजणी प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीसाठी अर्ज केला होता.

त्यानंतर आता अचानक बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मतदान यंत्रांच्या तपासणीतून माघार घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाच्यावतीने मतदान यंत्राविरोधात आंदोलनाची हाक दिल्यानंतर युगेंद्र पवार यांनी अचानकपणे फेर मतमोजणीच्या प्रक्रियेतून माघार घेतल्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. युगेंद्र पवारांनी याबाबत जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केला आहे.

मतमोजणी वेळी एखाद्या उमेदवाराने दोन तासांच्या आत आक्षेप घेतल्यास फेरमतमोजणी घेण्यात येते. त्यानंतर आक्षेप आल्यास व उमेदवार न्यायालयात गेल्यास फेर मतमोजणी घेण्यात येते. त्यासाठी सर्व मतदान यंत्रांमधील मतांची माहिती 45 दिवसांसाठी सुरक्षित ठेवली जाते.

हा कालावधी येत्या ६ जानेवारीला संपत आहे. मात्र, आता अचानकपणे बारामती विधानसभा मतदासंघातील शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी फेरमतमोजणी प्रक्रियेतूनच माघार घेतली असल्याने आता चर्चांना उधाण आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!