युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न, पवार कुटुंब एकत्र

पुणे : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखपुडा आज संपन्न झाला.त्यांच्या साखरपुड्याला अजित पवार यांनी सहकुटुंब हजेरी लावली. त्याचसोबत शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे देखील आपल्या कुटुंबीयांसोबत आले होते.
मुंबईतल्या प्रभादेवी येथील तनिष्काच्या घरी पारंपारिक पद्धतीने साखपुड्याचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने पवार कुटुंबीय एकत्र आले होते. या साखपुड्याचे फोटो देखील समोर आले आहेत. यामध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी हे दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. युगेंद्र पवार आणि तनिष्का यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.दरम्यान युगेंद्र पवार यांच्यापूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पुण्यात पार पडला होता. तेव्हा देखील पवार कुटुंबीय एकत्र आले होते. त्यानंतर युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंबीय एकत्र आले.
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र पवार हे तरुण नेते असून काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सक्रीय राजकारणात एन्ट्री केली होती. त्यांनी विधानसभा निवडणुकीत काका अजित पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग आहे.