Yugendra Pawar : मोठी बातमी! सुप्रिया सुळे यांचा प्रचार केलेले युगेंद्र पवार यांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवलं? चर्चांना उधाण..

Yugendra Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला. असे असताना सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय झालेल्या युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. युगेंद्र पवार यांनीही आपल्याला या संदर्भातील कोणतेही पत्र मिळालेले नसल्याची माहिती आज पत्रकारांना दिली. मात्र या चर्चेने बारामती तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राजकारण झालं की बारामतीत सगळे एकत्र असतात, मात्र आता एक वेगळं चित्र निर्माण झाले आहे. याबाबत युगेंद्र पवार म्हणाले, परवा एका ठिकाणी बैठक झाल्याचे कानावर आले आहे. मात्र माझ्याकडे कोणतेही अधिकृत पत्र आलेले नाही.
ही केवळ चर्चा आहे. कोणी कशावरही चर्चा करेल, मात्र प्रत्येक चर्चा खरीच असते असे नाही. गेली तीन-चार वर्षापासून मी कुस्तीगीर संघाची जबाबदारी पार पाडत आहे. या काळात खूप कामे केली दादांनी देखील मदत केलेली आहे. Yugendra Pawar
सुप्रिया सुळे यांच्या बाजूने काम केल्याची ही पोचपावती आहे का? असे विचारले असता युगेंद्र पवार म्हणाले, तुम्ही याबाबत जो अर्थ लावायचा तो लावू शकता. मात्र माझ्याकडे कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही.
यासंदर्भात जर काही पत्र व्यवहार यावर झाला, तर ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट मी या संदर्भात घेईल, असेही ते म्हणाले. यामुळे आता याबाबत पुढे अजून कोणती माहिती समोर येणार हे लवकरच समजेल.