मुठा नदीत अडकलेल्या तरुणाचा जीव वाचला, अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवले प्राण…


पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथे मुठा नदीपात्रामध्ये एक तरुण नदीपात्रात अडकला होता. या तरुणाची अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परतेने सुटका करीत त्याला जीवदान दिले. यामुळे या तरुणाचे प्राण वाचले आहे.

या जवानांना एक तरुण नदीच्या मधोमध जलपर्णी व एका झाडाचा आसरा घेऊन पाण्यात अडकल्याचे निदर्शनास आले. अग्निशामक दलाचे जवान तत्परतेने नदीमधे दोर, लाईफ जॅकेट व लाईफ रिंगच्या साह्याने पाण्यात उतरले.

अर्ध्या तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. या तरुणाला दुखापत झालेली असल्याने शासकीय रुग्णवाहिका 108 मधून दवाखान्यात उपचारांसाठी पाठवण्यात आले.

अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच नदीमधे पाण्यात पोहत जाऊन तरुणाला जीवदान देणारे तांडेल राजाराम केदारी, संदिप रणदिवे व फायरमन चंद्रकांत नवले, सुरज बडे आणि वाहनचालक अक्षय कलशेट्टी यांनी त्यांना वाचवण्यात मदत केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!