पुण्यात खळबळ! तरुणाचा दगडाने ठेचून खून, पाच अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुण्यातील वानवडी परिसरात एका तरुणाचा टोळक्याने दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (ता.२) पहाटे एकच्या सुमारास काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर घडली आहे. या गुन्ह्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
महादेव रघुनाथ मोरे(वय. २५ रा. काळेपडळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांनी मुलांना ताब्यात घतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा पुढील पोलीस तपास करीत आहेत.
Views:
[jp_post_view]