थेऊर कंटेनरचा व दुचाकीच्या अपघात तरुण जागीच ठार , तर एकजण गंभीर जखमी!

पुणे : थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीजवळील वळणावर दुचाकी व कंटेनरचा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. आज सोमवारी (ता. 02) सकाळी पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
अपघातात मयत झालेल्या तरुणाचे व जखमीचे नाव अद्याप समजू शकले नसून केसनंद व वाघोली बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील दोघेजण वाघोली बाजूकडे दुचाकीवरून निघाले होते. यावेळी थेऊर हद्दीतील स्मशानभूमीजवळ असलेल्या वळणावर दुचाकी चालकाला उतार व वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकी चालक थेट कंटेनरच्या खाली घुसली.या घटनेत दुचाकीवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे.
Views:
[jp_post_view]