पुणे जिल्ह्यात बिल जास्त लावल्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण ; 6 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात हाणामारी, खून, अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच सासवड जवळील वीर गावात बिअरचे बिल जास्त लावल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाला
अमानुषपणे मारहाण करत गावातून धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,सौरभ सुरेश वाघ असे पीडित तरुणाचे नाव आहे. त्यांचे समृद्धी बिअर बार हॉटेलमध्ये चायनीज किचन आहे.या हॉटेलमध्ये दिलीप विलास धुमाळ आणि अमोल आप्पासाहेब धुमाळ हे बिअर पिण्यासाठी आले होते. त्यावेळी बारचे मालक गैरहजर असताना वाघ यांनी त्यांना बिल दिले. मात्र, बिल जास्त लावल्याचा आरोप करत या दोघांनी वाद घालायला सुरुवात केली. वादाच्या ओघात त्यांनी आपल्या इतर नातेवाईकांना देखील बोलावून वाघ यांना दमदाटी केली आणि हाताने मारहाण केली.याप्रकरणी दिलीप विलास धुमाळ, अमोल आप्पासाहेब धुमाळ, कमलेश शिवाजी धुमाळ, संदीप दादासाहेब धुमाळ, सत्यजित प्रताप सिंग धुमाळ, शंभुराज महादेव धुमाळ यांचा समावेश असून सासवड पोलिसांनी सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये मोठा संताप पसरला असून, पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे
