तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून राहत्या घरीच बलात्कार ! फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल….


लोणी काळभोर : तरुणीला लग्न करण्याचे खोटे वचन देवुन तिच्यावर वेळोवेळी त्यांचे राहते घरी, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी लैगिक संभोग केला. तसेच पिडीतेने लग्न करण्याचे वचन पाळण्याचा हट्ट धरु नये, म्हणुन तिला शिवीगाळ व मारहाण करून “तुला काय तक्रार करायची ते कर, मला कोणी काही करु शकत नाही” अशी धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून अजिंक्य रायसिंग जाधव, (वय ३२, रा. पाटील नगर, चिखली, पिंपरी चिंचवड, पुणे.) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, सदर प्रकार सप्टेबर २०२३ ते ३० जुलै २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीत घडला आहे. या कालावधी मध्ये त्याने पिडीतेशी ओळख करुन घेवुन त्यासाठी कपटपूर्ण मार्गाचा अवलंब करुन तिच्याशी विवाह करण्याचे वचन पुर्ण करण्याचा कोणताही इरादा नसताना लग्न करण्याचे खोटे वचन देवुन तिचेशी वेळोवेळी त्यांचे राहते घरी, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी लैगिक संभोग केला. तसेच पिडीतेने त्याने दिलेले लग्न करण्याचे वचन पाळणयचा हट्ट धरु नये, म्हणुन तिला शिवीगाळ व मारहाण केली आहे. त्याचबरोबर त्याने “तुला काय तक्रार करायची ते कर, मला कोणी काही करु शकत नाही” अशी धमकी दिली.

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडीतेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यांवरून अजिंक्य जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे हे करत आहेत.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!