ब्यूटी पार्लरमध्ये नोकरी देतो म्हणत तरुणीला पुण्यात आणलं अन् बुधवार पेठेत नेलं, धक्कादायक माहिती आला समोर…

पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी ब्यूटी पार्लरमध्ये नोकरी देतो, असे सांगून बांगलादेशातून पुण्यात आणलेल्या एका तरुणीला बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करण्यासाठी धमकावल्याचा प्रकार उघड झाला. यामुळे खळबळ उडाली.

याबाबत तपास सुरू आहे. या तरुणीने वेश्या व्यवसायास नकार दिल्यामुळे खोलीत डांबून तिला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एका सामाजिक संस्थेच्या निदर्शनास आली. नंतर सहकारनगर पोलिसांच्या मदतीने तरुणीची सुटका केली.
तरुणीला पुण्यात आणले. त्यानंतर तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिने विरोध केल्यावर अभिषेकने तिला पट्ट्याने मारहाण केली आणि खोलीत बंद करून ठेवले. यानंतर तिला मारहाण देखील करण्यात आली आहे. नंतर या तरुणीने मोबाइलवरून बांगलादेशातील पोलिसांशी संपर्क साधला.

दरम्यान, त्यांचा पुण्यातील एका सामाजिक संस्थेशी संपर्क केला. यानंतर सहकारनगर ठाण्यातील गुन्हे शाखेच्या निरीक्षक सुरेखा चव्हाण यांच्या पथकाने शोध मोहीम राबवून आरोपींना अटक करून पीडितेची सुटका केली. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
दरम्यान, 15 दिवसांत या आरोपींनी तिचे आधार कार्ड काढल्याचेही प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात अटक आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुण्यात अशी अनेक धक्कादायक प्रकरणे पुढे येत आहेत.