मित्रानेच केला घात अन् सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकला तरूण, स्वतःच संपवलं जीवन, भयंकर माहिती आली समोर…


मुंबईतील वडाळा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तन्मय केणीने आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. तन्मयचे नाव एका सेक्स रॅकेट प्रकरणात समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी दडपणाखाली असलेल्या तन्मयने पोलीस ठाण्यातून पळ काढला.

तसेच काही दिवसांनी त्याने आपले जीवन संपवले. या प्रकरणाचा तपास वडाळा पोलिसांकडून सुरू आहे. प्रतीक्षा नगर परिसरात राहणाऱ्या सचिन करंजेवर मुलींना काम देण्याचे आमिष दाखवून त्यांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. मुलींना लॉजवर नेऊन गुंगीचे औषध देऊन त्यांचे फोटो काढत त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन विरोधात एका तरुणीने तक्रार दिली होती.

नंतर पोलिसांनी सचिनला अटक करून चौकशी सुरु केली. सचिनने तन्मय केणीचे आधारकार्ड वापरून हा गैरप्रकार केल्याचे समोर आले. सचिन करंजेने फसवणूक केल्यामुळे आणि ब्लॅकमेलिंगच्या दडपणामुळे तन्मय खूपच तणावाखाली होता. यामुळे त्याला टेन्शन आलं होतं.

त्याला पोलिसांनी चौकशीसाठी त्याला बोलावले होते, पण तेव्हाच तो पोलीस ठाण्यातून पळून गेला. काही दिवसांनंतर तो बेशुद्ध अवस्थेत सापडला आणि त्याठिकाणी एक चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत तन्मयने सचिनच्या नावाचा उल्लेख करत, मला सचिनने फसवले आणि ब्लॅकमेल केले. त्याच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असे लिहिले होते. यामुळे सगळेच हादरले.

तसेच त्याला फाशी झाली पाहिजे. सॉरी मम्मी-पप्पा. असे चिठ्ठीत लिहिले होते. तन्मयच्या आत्महत्येप्रकरणी वडाळा आणि मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे का? याबाबत तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!