YouTube ची पुन्हा एकदा मोठी कारवाई! भारतातील १९ लाख व्हिडिओ हटवले, घडलं काय.?


नवी दिल्ली : सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. आजकाल सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात होत असून तसेच काही प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पैसे देखील कमवता येतात. यामध्ये You Tube हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ , शॉर्ट्स व्हिडीओ अपलोड करू शकतो.

याच कालावधीमध्ये युट्युबने जागतिक स्तरावर कम्युनिटी गाइलाईन्सचे उल्लघंन केल्याप्रकरणी ६४ लाख ८० हजार व्हिडीओ हटवले आहेत.

युट्युबला मिळालेल्या तक्रारीनुसार, जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान भारतात युट्युबच्या कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्यामुळे १९ लाखांपेक्षा अधिक व्हिडीओ कंपनीने हटवले आहेत.

या तुलनेत अमेरिकेमध्ये ६,५४,९६८ तर रशियामध्ये ४,९१,९३३ आणि ब्राझीलमध्ये ४,४९,९३३ व्हिडीओ युट्युबने हटवले आहेत. एक कंपनी म्हणून सुरुवातीपासूनच आमच्या कम्युनिटी गाईडलाइन्सनी ययुट्युब वापरकर्त्यांना हानिकारक कंटेंटपासून संरक्षण दिले आहे.

आम्ही मशीन लर्निंग आणि मानवी समीक्षक या दोघांच्या मदतीने आमच्या कम्युनिटी गाईडलाईन्स लागू करतो. असे युट्युब म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!