‘तू आधी टेक ऑफ घे, बाकी…’, विमान मालकाचा पायलटला आदेश? रोहित पवारांच्या नव्या आरोपानं खळबळ


मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी VSR कंपनीच्या मालकाची कसून चौकशी केली जात आहे.अशातच आता राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे.तू आधी टेक ऑफ घे, बाकी नंतर बघून घेऊ, असा थेट आदेश व्ही.के. सिंगने पायलटला दिला होता, असा नवा आरोप रोहित पवारांनी केला आहे. यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन अजित पवारांना घेऊन जाणाऱ्या व्हीएसआर विमान कंपनीवर अनेक आरोप केले आहेत. तसेच या विमान कंपनीचे मालक व्ही.के सिंग याला बड्या राजकीय नेत्यांकडून वाचवलं जात आहे? असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यांनी सीआयडी तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

या घडामोडीनंतर अजित पवारांच्या विमानाचं उड्डाण घेण्याआधी काय झालं? याबाबतचा खुलासा रोहित पवारांनी केला आहे. विमानाचे मालक व्हीके सिंग यांनी दृश्यमानता कमी असताना देखील विमानाचं टेक ऑफ करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप केला आहे. शिवाय अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीबीआय आपल्याकडे का घेत नाहीये, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

दरम्यान रोहित पवार पुढे म्हणाले, पायलटच्या रक्तात दारू किंवा विष काहीच नव्हतं. मग पायलटवर दबाव होता का? व्ही के सिंग ला का वाचवलं जातंय? अजितदादांचं विमान पडलं की पाडलं गेलं? याचं उत्तर आम्हाला हवंय. व्ही के. सिंग कुणाचं तरी नाव घेईल, म्हणून त्याला वाचवलं जातंय का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!