भावकीने लक्ष दिलं म्हणून निवडून आलास, अजितदादांच्या टोमण्याला आता रोहित पवारांच्या वडिलांचं उत्तर; म्हणाले, पवार कुटुंबात प्रत्येक काकाने…


पुणे : पवार घराण्यात आजवर प्रत्येक काकाने पुतण्याला मदत केली आहे. किंबहुना ती पवार घराण्याची परंपराच आहे, असे वक्तव्य रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी केले. काही दिवसांपूर्वी सांगलीतील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी रोहित पवार यांना शा‍ब्दिक चिमटा काढला होता.

आपण पोस्टल मतांवर निवडून आलोय, हे लक्षात ठेवावं. भावकीने लक्ष घातलं नसतं तर तू निवडून आला नसता, असा टोला अजित पवार यांनी रोहित पवारांना लगावला होता. या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार यांनी बुधवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीच्या काळात अजित पवार ज्यावेळी निवडणूक लढले होते तेव्हा माझ्या वडिलांनी म्हणजे आप्पासाहेबांनी त्यांना मदत केली होती.

नवख्या माणसाला किती मतदान पडतं आपल्याला माहिती आहे. परंतु, त्यानंतर अजित पवार यांनी 35 वर्षे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्त्व केले. काहीजण पोस्टल मतावरती निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते, असे राजेंद्र पवार यांनी म्हटले.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याला निवडणुकीत वडील माझा विचार करतील असं मला वाटलं होतं. परंतु आमच्या सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो. तिथेदेखील मला बघितलं नाही त्यावेळी माझ्या वडिलांनी अजितदादांना संधी दिली. मला तिसऱ्यांदा संधी मिळाली पण त्यावेळेस देखील मला सांगितलं गेलं की, सगळ्यांनीच राजकारणात यायचं नसतं. तेव्हा मला त्यांचं बोलणं पटलं, मग मी शांत बसलो.

त्यावेळेस मला माहित नव्हतं की, संधी असते त्यावेळेस खेचून घ्यायची असते. मला कारखान्याला संधी दिली नाही. त्यानंतर वाटलं असेल की हा कारखाने काढेल. जळगावला काढेल, नगरला काढेल, मराठवाड्यात काढेल, बारामतीच्या आसपास काढेल आणि त्यामुळे माझ्या काकांनी मला संधी दिली नाही आणि मी आता इथे तुम्हाला एआय तंत्रज्ञान काय आहे सांगायला उभा राहिलो आहे. भविष्यात एआय तंत्रज्ञानाशिवाय गत्यंतर नाही.

अख्ख्या राज्याला किस्सा माहिती आहे आम्ही गाई आणायला गेलो, त्यावेळी अजितदादा केबिनमध्ये बसले आणि मी पाठीमागे गाईच्या शेपटाजवळ बसलो. दादा पुढच्या केबिनमधून पुढच्या केबिनमध्ये, पुढच्या केबिनमध्ये, पुढच्या केबिनमध्ये गेले, मात्र आम्ही तिथेच मागे राहिलो. दादांना गायींचा व्यवसाय चांगला जमायचा. माझी गाय तीन हजाराला गेली की दादांची गाय नऊ हजाराला जायची, असे राजेंद्र पवार यांनी म्हटले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!