योगाचार्य राजश्री रावडे यांना राज्यस्तरीय’योगरत्न’ पुरस्कार प्रदान; योग शिक्षण व प्रशिक्षणात बहुमूल्य योगदानाबद्दल पुरस्कार….

पुणे : थेरगाव (पिंपरी चिंचवड ) येथील सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक तसेच योगाचार्य राजश्री मनोज रावडे यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए.जी .एम. ए व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) डॉक्टर सेल आयुष विभाग वतीने अतिशय प्रतिष्ठेचा योगरत्न पुरस्कार मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्य उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैद्यकीय सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार हे कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते. कार्यक्रमास उद्योजक मनोज दांडगे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैद्यकीय सेल प्रदेश कार्याध्यक्ष डॉ .नितीन राजे पाटील, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ.सतीश कराळे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, प्राध्यापक कुणाल महाजन, मनोहर कानडे, व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजश्री रावडे यांनी योग अभ्यासक्रमात योग पदविका एम. ए तसेच योग पदवीकापूर्व अभ्यासक्रम लेवल -३ हा योग अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. योग वर्ग प्रशिक्षण तसेच योग साधननेची जनजागृती करण्याचे कार्य त्या करीत आहेत.
त्यांचे मूळचे माहेर हे सोरतापवाडी ( ता.हवेली ) येथील चौधरी परिवारातील आहे. योगाचार्य राजश्री मनोज रावडे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून यांचे कौतुक होत आहे.