यशवंत कारखाना सभासदच निवडणूक घेऊन चालू करणार ! सर्वसाधारण सभेत सभासदांनी बहुमताने ठराव केला मंजुर…!
उरुळी कांचन :आगामी काळात संचालक मंडळाची निवडणूक घेऊन सभासद निवडून देणाऱ्या संचालक मंडळाच्या मार्फत कारखाना सुरू करण्याची कार्यवाही करण्याचा महत्वपूर्ण ठराव ‘यशवंत’ च्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी घेतला आहे.
थेऊर (ता.हवेली ) येथे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी शासन नियुक्त प्रशासक मंडळाचे सदस्य डी.एन.पवार , ज्येष्ठ नेते व कारखान्याचे माजी अध्यक्ष के.डी.कांचन, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश घुले , पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, माजी संचालक प्रकाश म्हस्के,राज्य साखर कारखाना कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, हवेली बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे , प्रकाश जगताप, देविदास भन्साळी, महादेव कांचन, राजाराम कांचन , राजेंद्र टिळेकर ,पै. राहुल काळभोर, प्रशांत काळभोर ,राहुल शेवाळे, विकास लवांडे आदी मान्यवरव सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेत कारखान्याचे शासन नियुक्त समितीचे अध्यक्ष संजय गोंदे यांनी कारखान्याच्या विषयपत्रिकेवरील विषय मांडण्यापूर्वी कारखान्याची अर्थिक तसेच प्राप्त परिस्थितीची अवलोकन सभेला करुन दिली. २०११ गळीतापासून कारखाना बंद पडल्यापासून झालेले कामकाज सभेपुढे मांडण्यात आले. कारखान्याचे २०१८ ते २०२२ पर्यंत शासन लेखापरिक्षण करण्यात आल्याचे सभेला सांगण्यात आले. तर कारखान्याची ११७ एकर जमिन सर्फेसी ऍक्टनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँककडे तारण असल्याचे सांगितले. तर संस्था 2011 मध्ये बंद पडल्यानंतर सर्व वित्तीय संस्था , सभासद व कामगार देणी ,शासन देणी मिळून १४८ कोटींचे कर्जापोटी देणे होते. तर २७ कोटीची साखर शिल्लक वगळता १२१ कोंटीची देणी होती. तर ११ वर्षांनंतर चालू अर्थिक वर्षात वित्तीय संस्था (व्याजाहसहीत) ११५ कोटी तर सभासद व कामगार देणी हा निश्चित आकडा १५० कोटी देणी असल्याची माहिती देण्यात आली.
यावर शासन नियुक्त समितीने आवसायक रद्द केल्याचा आदेश व २०१८ ते २०२२ पर्यंत चे शासन लेखापरिक्षण झाले असल्याची माहिती सभेपुढे दिली. त्यानंतर साखर कारखाना हा कर्जाची उपलब्धता , कारखान्याचे कामकाज करण्यासाठी अर्थिक तरतूदीसाठी चालू स्थितीत असर्थ असल्याने कारखाना चालू करण्यासाठी सभासदांनी निर्णय घ्यावा , असे आवाहन करुन सभासदांची मते मांडण्यात आली. यावर सभासदांनी कारखाना भाडेतत्त्वावर न देता, सभासद निवडणूकीचा खर्च उभा करुन निवडणूक घेण्याची मते सभासदांनी मांडली.आणि कारखाना चालू करण्यासाठी निवडणूक घेऊन निवडून येणारे संचालक मंडळ कारखाना सुरू करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. तर उर्वरीत विषय मंजूर करण्यात येऊन सभा संपन्न झाली.
दरम्यान कारखाना सभासद आण्णासाहेब काळभोर यांनी
कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी कारखान्याचे आवसायक रद्द बातल करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत यश मिळून दिल्याने अभिनंदनाचा ठराव मांडला.
कारखान्याची महत्वाची कागदपत्रे कुजली व सडली !
कारखाना गेली ११ वर्षे बंद असल्याने कारखान्याकडे सभासदांचे शेअर्स माहिती, सभासद नावे व संख्या, कामगार व सभासद देणी आकडेवारी , कारखान्याला देऊ असणारी रक्कम अत्यंत महत्वाची माहिती कागदपत्रे जिर्ण, सडल्याने प्राप्त होत नसल्याची वस्तुस्थिती सभासदांना सांगण्यात आली. त्यामुळे पुढील कार्यालयीन कामकाजाचे आव्हान आता सभासदांपुढे असणार आहे.