काल मोठी गारपीट, आजची भयंकर संकट! 7 जिल्हे संकटात, हाय अलर्ट जारी, पुढील 24 तास महत्वाचे…

मुंबई : सध्या राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. काही भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आता आजही अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा इशारा देण्यात आला. काल राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून थंडगार हवामान झाले. आता आजही मोठा इशारा देण्यात आला. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. पुढील काही तास या जिल्ह्यांसाठी अत्यंत धोकादायक असणार आहेत.
इतरही भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, संभाजीनगरमध्ये काल जोरदार अवकाळी पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात गारपीट, रब्बी पिक मोठ नुकसान झाले. गहू, ज्वारी, बाजरीसह फळबागायती व भाजीपाला पिकाला मोठा फटका या अवकाळी पावसामुळे बसला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
तसेच गारपीट झाल्याने सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठा पाऊस झाला. सुमारे दीड तासाहून अधिक काळ गारपिटीचा पाऊस सुरू होता. गारपिटीच्या पावसामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. यामुळे काही तास अजूनही महत्वाचे आहेत.