राज्यात पुढील दोन दिवसात तापमानाचा येलो अलर्ट!! पाच दिवस पाराही चढणार, जाणून घ्या..

पुणे : येणाऱ्या पाच दिवसात कोकणपट्यात गोव्यात आणि उत्तर महाराष्ट्रात तीव्र हवामान होण्याचे संकेत आहेत. कोकणामध्ये साधारणतः तापमानापेक्षा पाच अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता असून त्याचा फटका मुंबई आणि पुण्याला देखील बसण्याची शक्यता आहे, याबाबत पुण्याच्या प्रादेशिक हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.
अंदाजात असे सांगण्यात आले आहे की, कोकण आणि गोव्यात 25 फेब्रुवारीपर्यंत प्रचंड उष्णता आणि आर्द्रता राहील. नव्याने वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिमी चक्रावात तयार झाला असून हिमालयीन प्रदेशातून आर्द्रता कमी होत जाणार असल्याने हिमालयाच्या जवळ असलेल्या राज्यात मुसळधार पाऊस होईल.
महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान होते, मात्र आता तापमानात वाढ होणार आहे. सामान्य तापमानाच्या तुलनेत तीन ते पाच अंशाची वाढ अंदाजित केली असल्याने या येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. दोन दिवस आधी पूर्वेकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे देशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार काही भागात पाऊस देखील पडला. याचा परिणाम महाराष्ट्रावरील थोडाफार झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा बदल दिसणार आहे.
यामुळे पुढील काळात वातावरणात काही बदल दिसणार आहेत. सध्या उत्तरेत देखील उष्णता वाढायला लागली आहे. याचा परिणाम इतर राज्यात देखील दिसून येईल. थंडी देखील सध्या कमी झाली आहे.