महाराष्ट्रात येलो अलर्ट, हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ…

पुणे : शेतकऱ्यांना चिंते टाकणारी एक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. होळीनंतर उष्णता वाढण्याचे संकेत होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले.
आज हवामान खात्याकडून आठ जिल्हांमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट हा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले. अजूनही अवकाळीचे ढग आहेत. राज्यात पावसाला पोषक असे वातावरण आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे पाऱ्यात घट झाली होती. मात्र, आता तर काही भागांमध्ये परत एकदा अवकाळी पाऊस आणि वाऱ्याचा इशारा हा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
यामुळे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. हवामान ढगाळ असल्याने उकाडा वाढण्याचीही शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सूर्य आग ओकताना दिसतोय. आता गडचिरोली, भंडारा, गोदिंया, अमरावती, वर्धा, नागपूर याठिकाणी वारे, विजांचा कडकडाट आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. याबाबत इशाराच हवामान खात्याकडून देण्यात आलाय.
तसेच जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्हांमध्ये रात्रीच्या वेळी उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात देखील हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला होता. अवकाळी पावसामुळे फळ बागांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे राज्यात बघायला मिळतं आहे.
मुंबई आणि पुण्यात सामान्य वातावरण बघायला मिळाले. सांगली, लातूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. आताही अवकाळीचा इशारा देण्यात आलाय. होळीच्या अगोदर हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा दोनदा इशारा देण्यात आला होता. अनेक शहरांमध्ये पारा ४१ अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्याचेही बघायला मिळाले.
जळगाव आणि अकोल्यात ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. दुसरीकडे तीन जिल्हांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी उष्णता तसेच अवकाळी पावसाचा खेळ बघायला मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.