यवत चौथ्या दिवशीही बंदच!! बाजारपेठेत शुकशुकाट, व्यवसायिकांचे मोठे नुकसान….


यवत : दौंड तालुक्यातील यवत परिसरात मागील आठ दिवसांपासून तणावाचे वातावरण असून अशांतता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शुक्रवारी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून आज सलग चौथ्या दिवशीही अत्यावश्यक सेवा वगळता यवत गाव पूर्णपणे बंद होते.

गावात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून सध्या यवतमध्ये शांततेचे वातावरण असले तरीही भीतीचे सावट कायम असल्याचे चित्र आहे. मात्र पोलिसांनी धार्मिक स्थळे, दुकाने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

यवत येथे (ता.१) रोजी सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे अनेक ठिकाणी जमावाकडून जाळपोळ व दगडफेक करण्यात आली होती. काही वेळातच पोलिस प्रशासनाने परस्थिती आटोक्यात आणली असून यवत जमाबंदी आदेश लागू असल्याने आज सलग चौथ्या दिवशी ही संपूर्ण बाजारपेठ बंद असून सर्वत्र भयाण शांतता पसरलेली आहे. शंभर जणांच्या आसपास गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील १५ जणांना दौंड न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या सभेमुळेच आणि त्यांनी केलेल्या चिथावणी खोर भाषणामुळेच ही दंगल झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला असून आमदार गोपीचंद पडळकर आणि जगताप यांच्यावर ही गुन्हे दाखल करण्याची मागणी पवार यांनी केली आहे.

दरम्यान, गावात चौका चौकात पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला असून गावात अनेकांचा उधार निर्वाह हा दैनंदिन व्यवहारावर अवलंबून असून यवत बाजारपेठ पुन्हा कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिक व व्यापारी विचारत आहे. बाहेरून येऊन काहींनी स्थानिकांची माथी भडकावून स्थानिक हिंदू मुस्लिम समाजात वाद निर्माण केले अशी चर्चा नागरिक करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!