Yavat News : कासुर्डीत नाकाबंदीत सापडली १ हजार लिटर दारु! रासरोसपणे हातभट्टीची वाहतुक मात्र कारवाई आज का…!

जीवन शेंडकर
Yavat News यवत : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलीस स्टेशन हद्दीतील कासुर्डी टोल नाका येथे बुधवारी (ता.२०) रोजी साडेतीनच्या सुमारास एका वाहनातून १००० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. Yavat News
सोलापूर वरून पुणे कडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करीत असताना एका स्काॅर्पिओतून (एम.एच.१२ ई.जी. ११४१ या गाडीमध्ये ३० काळे रंगाचे कॅन आढळून आले, याची तपासणी केली असता, त्यामध्ये १००० लिटर गावठी हातभट्टीची तयार विक्री करीता घेवुन जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
शौकतअली हसन पटेल (वय. ३८ सध्या रा.मार्केटयार्ड आंबेडकरनगर झोपडपटटी गल्ली नं.४ बिबवेवाडी पुणे, मुळ रा.खेडा, ता.अबजलपुर, जि.कलबुर्गी, राज्य.कर्नाटक) व दत्ता कुमार चव्हाण (वय. २२ सध्या रा.मार्केटयार्ड आंबेडकरनगर झोपडपटटी गल्ली नं.4 बिबवेवाडी पुणे, मुळ रा.निलंगा आंबेडकरनगर, ता.निलंगा जि.लातुर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहनासह ९० हजार रुपये किंमतीची ३५ लिटरचे ३० कॅन्डसह एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलीस नाईक अजित काळे यांच्या फिर्यादीवरून शौकतअली हसन पटेल व दत्ता चव्हाण यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पथक करीत आहे.