Yavat : यवतमध्ये हातभट्टी चकलांवर मोठी कारवाई! शेलारवाडी व नाथाचीवाडी येथे २ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त…


Yavat : यवत पोलिसांनी गेल्या दोन दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हातभट्टी चालकांवर कारवाई केली आहे. अशी माहिती यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे. ( ता.२३) रोजी खामगाव येथील शेलारवाडी येथे तर (ता.२४) रोजी नाथाचीवाडी येथील हातभट्टी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, खामगाव गावच्या हद्दीतील शेलारवाडी येथील ओढ्याच्या कडेला (ता.२३) रोजी रात्री १० च्या सुमारास आरोपी सलमान दुल्ला गुडदावत (वय.४० रा. खामगाव, शेलारवाडी, ता. दौंड) हा दोन हजार लीटर कच्चे रसायन व इतर साहित्य तर १७५ लीटर तयार गावठी हातभट्टीची दारू असा एकूण ९५ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाल सहित आढळून आला आहे. याबाबत पोलीस हवालदार रामदास जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

तर नाथाचीवाडी गावाच्या हद्दीतील हाकेवाडी येथील हनुमंत आबा हाके यांच्या शेतात (ता.२४) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोपी अमरसिंग महानाजी यादव (वय.३२, सध्या रा. नाथाचीवाडी मूळ रा. कथारी, ता. आलोट, जि. रथलाम, मध्यप्रदेश) व संतोष जनमले हे दोघे जण गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे तीन हजार लिटर कच्चे रसायन व साहित्य तर १४० लिटर तयार गावठी हातभट्टीची तयार असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रु . किंमतीच्या मुद्देमालसह आढळून आले आहे. Yavat

याबाबत पोलीस शिपाई मारुती बाराते यांनी यवत पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. यावरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत नाथाचीवाडी येथील अमरसिंग महानाजी यादव व संतोष जनमले तर शेलारवाडी येथील गावठी हातभट्टी चालक सलमान दुल्ला गुडदावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही ठिकाणी एकूण २ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोर व पोलीस नाईक व्ही.डी. कापरे हे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group