‘यशवंत’ची सर्वसाधारण सभेची जमीन विक्री परवानगी तर ‘घोडगंगे’ला अर्थसंकल्पात निधी मंजूर करण्यासाठी प्रस्तावासाठी सूचना! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर-हवेलीतील कारखान्यांसाठी घेतले मोठे निर्णय…

उरुळीकांचन : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सद्यस्थितीची अर्थिक परिस्थिती अवलोकन करण्यासाठी लेखापरीक्षक नियुक्त करण्या-सह यांत्रिक स्थिती अवगत करण्यासाठी ‘व्हिएसआय’ ची पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊन राज्याच्या आगामी अर्थसंकल्पातून आवश्यक निधी मंजूर करुन घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची कार्यवाही तर यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन विक्रीसंदर्भात सर्वसाधारण सभेचा ठराव घेऊन प्रचलित बाजारमूल्य घेऊन कारखाना सुरु करण्याची कार्यवाहीला गती द्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्या असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिली आहे.
साखर आयुक्तालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिरुर तालुक्यातील घोडगंगा कारखाना तर हवेली तालुक्यातील यशवंत साखर कारखान्याचा मुद्दावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत या दोन्ही कारखान्यांच्या प्रश्नावर सहकार व राज्य सहकारी बॅकेचे प्रशासक यांची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सद्यस्थितीत या कारखान्यांच्या सुरू करण्यासाठीचा उपाययोजनांवर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. बैठकीत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील,आमदार ज्ञानेश्वर कटके,साखर आयुक्त कुणाल खेमनार, प्रादेशिक साखर सहसंचालक गितांजली गायकवाड, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्यादर अनास्कर ,’यशवंत’ चे अध्यक्ष सुभाष जगताप, घोडगंगेचे अध्यक्ष ऋषीराज पवार, माजी संचालक सुधीर फराटे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अर्थिक स्थितीवर सद्यस्थितीचा ताळेबंद हा संचालक मंडळानी १५ दिवसांत मांडावा तसेच लेखापरीक्षण नेमणूक करुन अर्थिक अहवाल आयुक्तालयास सादर करण्याची कार्यवाही करण्याची सूचना दिली. कारखान्यावरील कर्ज, देणी व यांत्रिक स्थितीचा अहवाल तयार सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत. अर्थिक स्थिती पाहून राज्याच्या अर्थसंकल्पात निधी मंजूर करुन कारखाना सुरू करता येईल असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला.
यशवंत कारखान्याबाबत राज्य सहकारी बँकेचा एकरकमी कर्जफेडीच्या प्रस्तावावर संचालक मंडळाला सहकार्य करुन या कारखान्यासाठी योग्य तो प्रस्ताव द्यावा तसेच भांडवल उभारणी करीता संचालक मंडळाने पुणे (हवेली ) बाजार समितीला देऊ केलेल्या प्रस्तावर संचालक मंडळाने सर्वसाधारण सभेची मंजूरी घेऊन जमीनीचे शासन मूल्य ठरवून फेरप्रस्ताव सादर कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. या दोन्ही कारखान्यांची कार्यवाही ही लवकरात करुन सर्व प्रस्ताव शासन मंजुरीसाठी तयार ठेवावेत असे निर्देश साखर आयुक्तांना दिले आहेत.
‘निवडणुकीत शब्द दिलाय तो पूर्ण करायचाय’
बैठकीत अजित पवार यांनी सहकार व राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकांना या कारखान्यांची कार्यवाही गतीने करावी असा सूचना देताना ‘हा माझा निवडणुकीतील शब्द आहे’ ‘ मी जनतेला व माऊली कटकेंना शब्द दिला आहे’ तो पूर्ण करायचा तेव्हा गांभीर्य लक्षात घेऊन या दोन्ही कारखान्यांच्या कार्यवाहीला गती द्यावी अशी इशारावजा सूचना केली आहे.
घोडगंगाच्या कारभाराची चौकशी पूर्ण करावी..
घौडगंगा कारखान्याचा कामकाजात अर्थिक गैरव्यवहार झाला असून सभासद म्हणून कलम ८९ च्या माझ्या अर्जावरील चौकशी प्रादेशिक सहसंचालक यांनी लवकर पूर्ण करावी तसेच कारखान्याच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून मागील ६ वर्षांच्या कालावधीत सहकार लेखापरीक्षण वर्ग १ फडणीस यांच्याशी संगनमत करुन सभासदांची सभासदांची दिशाफूल करणारा अर्थिक लेखाझोका लपविल्याची तक्रार निवेदन देऊन लेखापरीक्षक फडणीस व संचालक मंडळावर कारवाई करण्याचे निवेदन माजी संचालक सुधीर फराटे यांनी अजित पवार व आयुक्तांना दिले आहे.