‘यशवंत’ ची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सष्टेंबर रोजी होणार ; अर्थिक लेखाजोखा विषयांवर सभेचे आयोजन ; ऐनवेळी जमीन विक्रीचा मुद्दा चर्चेत येणार …..!


उरुळीकांचन : जमीन विक्री करुन सुरू होण्याच्या दृष्टीपथावरअसलेल्या थेऊर (ता.हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२८)आयोजित करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे.

गेली १४ वर्षे गळीतापासून बंद अवस्थेत असलेल्या व नुकत्याच राज्य मंत्रिमंडळाने कारखान्याची ९९ .२५ एकर जमीन पुणे बाजार समितीला विक्री करण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर आयोजित केलेल्या या सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सहकार नियमानुसार संस्थेची अर्थिक लेखाजोखा मांडण्यासाठी सभेची परवानगी घेण्यासाठी आयोजित या सभेसाठी इतर महत्त्वाचे विषय सभेत मांडण्यात येणार का ? म्हणून सभेकडे तालुक्याचे लक्ष लागणार आहे.सभेपुढे सन २०२४ -२०२५ या वर्षाचा संचालक मंडळानी सादर केलेला वार्षिक अहवाल, मागील इतिवृत्तांत कायम करणे, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके स्वीकारणे व त्यांची नोंद घेणे. सन २०२६-२७ वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या भांडवली व महसुली अंदाजपत्रकाची नोंद घेण्यात येणार आहे हे विषय विषमपत्रिकेवर येणार असून अध्यक्षांच्या परवानगीने इतर,विषय सभेपुढे मांडण्यात येणार आहे.

तसेच ऐनवेळी विषयांत सन २०२६ – २०२७ या वर्षाकरीता भांडवल उभारणीस संचालक मंडळास अधिकार देणे,३१ मार्च २०२५ अखेरच्या वर्षातील वैधानिक लेखापरीक्षकांचे अहवालाची नोंद घेण्यात येणार आहे. सन २०२५ -२६ वर्षाकरीता शासनमान्य वैधानिक लेखापरीक्षकांच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरविणे. अंतर्गत लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरविणे. तसेच अध्यक्षांचे परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर विचार करण्यात येणार आहे.

दरम्यान कारखान्याला अर्थिक भागभांडवल उभा करुन,संस्था सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने पुणे बाजार समितीला ९९.२५ एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव सहकार व पणन विभागामार्फत दिला आहे. त्यानुसार राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत या ठरावाला मंजुरी देऊन कायदेशीर संरक्षण दिले आहे. या पार्श्वभूमीवर या विक्री ठरावातील प्रमुख बाबी सभेपुढे येणार आहे. त्यामुळे या कारखान्याच्या भवितव्याची वाटचाल व परिस्थितीची मांडणी सभेत होणार असल्याने सभासद या बैठकीत कसे सामोरे जाणार म्हणून सभेकडे लक्ष असणार आहे. ही सभा कोलवडी-मांजरी खुर्द रस्त्यावर लक्ष्मी कार्यालयात सकाळी ११ वा.पासून सुरू होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!